मुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात “गोड्या पाण्यातील मत्स्य शेती” विषयावर प्रशिक्षण

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात (रत्नागिरी) “गोड्या पाण्यातील मत्स्य शेती” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण २ व ३ डिसेंबर या कालावधीत आयोजित केले होते. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन २ डिसेंबर रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी आणि रत्नागिरी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अंनत हनुमंते यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हनुमंते यांनी प्रशिक्षणार्थींनी गटशेती करून आपल्या उद्योगाला कसा फायदा होईल याबद्दल विचार करावा व आपली याशोगाथा हीच या प्रशिक्षणाचे फलित असल्याचे सांगितले. यावेळी बर्डेझचे (गोवा) प्रादेशिक कृषी कार्यालयाच्या कृषी अधिकारी पूजा महालकर, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञ वर्षा सदावर्ते उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत यांनी केले. सहाय्यक संशोधन अधिकारी नरेंद्र चोगले यांनी आभार मानले.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान “गोड्या पाण्यातील मत्स्य शेती सद्यस्थिती व भविष्य तसेच मत्स्य-शेती प्रकल्प अहवाल”, “माशांचे रोग व व्यवस्थापन”, “मत्स्यशेत पूर्व तयारी तसेच माशांची वाढ व नोंदी” “माशांची बीज ओळख, वाहतूक व संगोपन”, “जागेची निवड आणि तलाव बांधकाम”, “माशाच्या जाती” तसेच “मत्स्यशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन” “मत्स्य खाद्य व्यवस्थापन” या विषयांवर उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमदरम्यान “गोड्या पाण्यातील मत्स्य शेती सद्यस्थिती व भविष्य तसेच मत्स्य-शेती प्रकल्प अहवाल” याविषयी डॉ. केतन चौधरी यांनी, तर “माशांचे रोग व व्यवस्थापन” याविषयी डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले. “मत्स्यशेत पूर्व तयारी तसेच माशांची वाढ व नोंदी” याविषयी नरेंद्र चोगले, “माशांची बीज ओळख, वाहतूक व संगोपन” याविषयी डॉ. वैभव येवले, “जागेची निवड आणि तलाव बांधकाम” याविषयी डॉ. राकेश जाधव, “माशाच्या जाती” तसेच “मत्स्यशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन” विषयी श्रीमती वर्षा सदावर्ते, तर “मत्स्य खाद्य व्यवस्थापन” विषयी अपूर्वा सावंत यांनी मार्गदर्शन केले. “जलशायातील पिंजरा मत्स्य संवर्धन” यावर कृपेश सावंत, “मासे काढणी” यावर सुशील कांबळे, तर “काढणी पश्चात काळजी” यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या संशोधन केंद्रात विविध प्रशिक्षण आयोजित केली जात असल्याचे सांगितले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण घेतल्यानंतर लवकरात लवकर उद्योगास सुरवात करणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सांगितले. बर्डेझ येथील प्रादेशिक कृषी कार्यालयाच्या कृषी अधिकारी पूजा महालकर यांनी गोव्यातील शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

हा प्रशिक्षण यशस्वी करण्यास रमेश सावर्डेकर, श्रीकांत तांबे, जाई साळवी, दिनेश कुबल, महेश किल्लेकर, मनिष शिंदे, अण्णासाहेब कारखेले, भूमी भाटकर, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, राजेंद्र कडव, प्रवीण गायकवाड तसेच कंत्राटी मजूर तेजस जोशी, योगेश पिलणकर, अभिजीत मयेकर, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलणकर, केतन चव्हाण आणि दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!