मुख्य बातमी

स्वयंअर्थसहाय्यक शाळा अधिनियम अंतर्गत नवीन शाळा मान्यता व दर्जावाढ

स्वयंअर्थसहाय्यक ११ शाळांबाबत १५ दिवसांत हरकती व सूचना नोंदवा

रत्नागिरी : शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्य स्वयंअर्थसहाय्यक शाळा (स्थापना व विनियम) अधिनियम २०१२ व नियम २०२० अंतर्गत नवीन शाळा मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ करण्याबाबतचे प्रस्तावाबाबत छाननी समितीद्वारे छाननी करून शिक्षण विभाग जिल्ह्यातील ११ शाळांना मान्यता देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. प्राप्त संस्थद्वार संचलित स्वयंअर्थसहाय्य शाळेबाबत हरकती व सूचना असल्यास वृत्त प्रसिध्‍द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे नोंदवाव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना यांचा विचार केला जाणार नाही, असे क्षेत्रिय प्राधिकरण समिती सदस्य सचिव तथा उपशिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महाराष्ट्र राज्य स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ व नियम २०२० अंतर्गत नवीन शाळा मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ करण्याबाबतचे प्रस्तावाबाबत छाननी समितीद्वारे छाननी करून शिक्षण विभाग रत्नागिरी जिल्ह्यातील अंजुमान दर्द मंदाने तालीम ओ तराख ट्रस्ट महाड संचलित दारे आरकम इंग्लिश स्कूल, अंजुमान फलाहल मुस्लिमीन पिंपळी संचलित मॉडर्न पब्लिक स्कूल पिंपळी चिपळूण, फले दारेल एज्युकेशन सोसायटी संचलित अलि पब्लिक स्कूल चिपळूण, उर्जा एज्युकेशन सोसायटी संचलित माऊंटेन नॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज, मोहम्मदियाँ एज्युकेशन ट्रस्ट संचलित ए. ई. कालसेकर इंग्लिश मेडीयम स्कूल लांजा, मराठा मंदिर संचलित मराठा मंदिर ग्लोबल स्कूल, नाटे एज्युकेशन संचलित आयडीअल इंग्लिश स्कूल, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल चिंचघर दस्तुरी, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर गुहागर, खेडशी माध्यमिक शिक्षण संस्था संचलित श्री महालक्ष्मी प्रायमरी स्कूल, ईमेन्स फाऊंडेशन राजापूर संचलित ईमेन्स पब्लिक स्कूल राजापूर.

या संस्थेच्या शाळांना मान्यता पत्र देण्यासाठी राज्यस्तरीय प्राधिकरणाद्वारे शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस महाराष्ट्र राज्य स्वयं अर्थ सहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ मधील तरतुदीनुसार करण्यात आली आहे. हे शिफारस पात्र शाळांची यादी https://www.mahasfs.org/www.education.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. वरील शिफारस प्राप्त संस्थेद्वारा संचलित स्वयंअर्थसहाय्यित शाळांबाबत हरकती व सूचना असल्यास वृत्त प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी. यांच्याकडे नोंदवाव्यात, तद्नंतर येणाऱ्या हरकती व सुचना याचा विचार केला जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!