मुख्य बातमी

होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस

रत्नागिरी : होळी सणासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस (गाडी क्रमांक ०७३११/०७३१२) ही विशेष गाडी ११ आणि १५ मार्च रोजी धावणार आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी : (गाडी क्रमांक ०७३११/०७३१२) वास्को दा गामा – पाटणा – वास्को दा गामा एक्सप्रेस स्पेशल : गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल ही ट्रेन ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता वास्को द गामा येथून सुटेल. ही गाडी ट्रेन तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी वास्को द गामा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०७३१२ पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल ही ट्रेन १५ मार्च रोजी पाटण्याहून सायंकाळी ५ वाजून ४० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पटनाला पोहोचेल.

ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.

या गाडीला एकूण २० एलएचबी कोच असून, तिची रचना टू टायर एसी १ कोच, थ्री टायर एसी ५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार १ आणि एसएलआर १ अशी असेल.

प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!