महाराष्ट्रमुख्य बातमी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

छ.संभाजीनगर : काँग्रेसच्या राजकीय पटावरील अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी ओळख असणारे नेते ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. विधिज्ञ म्हणून युक्तीवाद करणाऱ्या शिवराज पाटील चाकुरकर यांनी लातूरच्या नगरपालिकेच्या राजकारणापासून सुरुवात केली. पण ते रमले मात्र दिल्लीमध्ये. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले.



