मुख्य बातमी

भारतीय बौद्ध महासभेतर्फे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती दिन साजरा

रत्नागिरी : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा व तालुका शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाध्यक्ष आयु. अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खेडशी नाका (विजय कांबळे यांच्या निवासी) साजरी करण्यात आली.

प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. व आदर्शांना पंचांग प्रणाम करून त्रिशरण पंचशील व सूत्र पठण घेण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक आयु. तानाजी कांबळे हे आपल्या विद्युत मंडळातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयु. अनंत सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानंतर सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विविध पैलूंवर आयु. डाॅ. जनार्दन मोहिते यांनी उपस्थितांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आयु. विजय मोहिते, राजेंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. अनंत सावंत यांनी मार्गदर्शन करताना सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक कामात आलेल्या अडचणींवर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य जोमाने कसे केले व आंबेडकर परिवाराला देण्यात आलेला त्रास याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रदीप जाधव, विजय कांबळे, तानाजी कांबळे, सुनील पवार, विजय जाधव, सुरेश जाधव, आदेश कांबळे, प्रवीण पवार, अनंत जाधव, राजेंद्र कांबळे व उपासक, उपासिका उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विजय जाधव यांनी केले. शरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!