मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी समृद्धी आंबेकरची निवड

११ जानेवारीला चिपळूणला होणार पुरस्कार वितरण

आबलोली : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे वितरित केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी समृध्दी सुरेश आंबेकर हिची निवड जाहीर करण्यात आली.

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती नुकत्याच झाल्या. यामध्ये जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण समारंभ ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. पाटपन्हाळे विद्यालयाची समृद्धी आंबेकर हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चव्हाण, पर्यवेक्षक एस. एस. मोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच पत्रकार, मित्रपरिवार यांनी समृध्दी आंबेकर व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!