‘लक्ष्मी ऑरगॅनिक्स’च्या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी : इटलीतून हद्दपार केलेली ‘मिटेनी’ (Miteni S.p.A) ही कंपनी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी (ता. खेड) येथील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक्स’च्या कंपनीमध्ये सुरू केल्यामुळे या कंपनीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी उप जिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांना देण्यात आले.
रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलेल्या या निवेदनात या कंपनीला आमच्या पक्षाचा विरोध असून ही कंपनी तात्काळ बंद करावी, अन्यथा कंपनीच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, सुभाष रहाटे, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, सरपंच सौ. अनिषा नागवेकर, विद्यमान नगरसेविका फौजीया मुजावर, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख अजित गुजर, नयन साळवी, मयुरेश पाटील, शशिकांत बारगोडे, तनवीर मुजावर, संदेश भिसे, उपविभागप्रमुख सचिन सावंतदेसाई, दिलावर गोदड, शाहनवाज काझी, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, माजी शाखाप्रमुख विनायक वास्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



