मुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे मार्गदर्शन

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रेझिंग डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये व्यसनाधीनता, सायबर गुन्हे, रेझिंग डे व महिला अत्याचार या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पालांडे, पोलीस हवालदार सागर जाधव, महिला पोलीस हवालदार सानिया कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल समीर वाडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी हत्यारांची देखील माहिती देण्यात आली. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या सायबर गुन्ह्यांविषयी विस्तृत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या संदर्भात विद्यार्थिनींनाआपली सुरक्षा व कायदा याविषयी माहिती दिली.

हा कार्यक्रम ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. नाईक, श्री. कोलगे, श्री. जाधव, श्री. लिंगायत, सौ. सुर्वे, सौ. शितूत, श्रीमती मोहिते, प्रमोद पांचाळ, श्रीमती खांडके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!