मुख्य बातमी

‘ऑफ्रोह ‘चा अलिबाग येथे १८ जानेवारीला विभागीय महिला मेळावा व सर्वसाधारण सभा

रत्नागिरी : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह), महाराष्ट्र शाखा रायगड, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑफ्रोह महिला आघाडीच्या वतीने विभागीय महिला मेळावा, सर्वसाधारण सभा व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम १८ जानेवारी रोजी सकाळी१०.३० वाजता भाग्यलक्ष्मी सभागृह, अलिबाग (जि. रायगड) येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग-मरूडचे आमदार महेंद्र दळवी, अलिबाग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर (छोटम शेठ), अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल, तर प्रमुख व्याख्याते म्हणून अन्यायग्रस्त आदिवासींच्या रणरागिणी सौ. गितांजली कोळी, ‘ऑफ्रोह’ चे मार्गदर्शक सुधाकर सुसलादी, आदिवासी कोळी समाजाचे दत्ताभाऊ सुरवसे, आदिवासी कोळी समाजाचे अभ्यासक प्रा. शरण खानापुरे व ‘ऑफ्रोह’ चे कार्यकारी राज्याध्यक्ष राजेश सोनपरोते, माजी राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, ऑफ्रोह महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रिया खापरे, भारती धुमाळ, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष रुक्मिणी धनी, ऑफ्रोह राज्य कार्यकारीणी सदस्य व ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे, ऑफ्रोह महिला आघाडी सहसचिव वनिता नंदनवार, कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, सचिव संदेश चोगले, जिल्हाध्यक्ष मोरेश्वर हाडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री बंदरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत.

या कार्यक्रमाला कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागातील ऑफ्रोह महिला आघाडी व ऑफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑफ्रोहचे राज्य प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर, ऑफ्रोह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!