मुख्य बातमी
पोमेंडी खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सभा संपन्न

रत्नागिरी : महात्मा गांधी तंटामुक्त समिती पोमेंडी खुर्दची वार्षिक सभा नुकतीच पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झाली. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले.
चालू वर्षी कोणताही नवीन तंटा समितीकडे प्राप्त नाही, अशी माहिती निमंत्रक पोलीस पाटील सौ. वीणा पटवर्धन यांनी दिली. समितीने असेच सहकार्य करावे, असे आवाहन तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप भडकमकर यांनी केले आणि सर्वांचे आभार मानण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संदीप भडकमकर पोलीस पाटील तथा निमंत्रण सौ. वीणा पटवर्धन, प्रशासक श्री. पवार, सदस्य सचिन पिलणकर, प्रकाश जाधव, दीपक भडकमकर, मिलिंद जाधव उपस्थित होते.



