मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोलीत हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री दालनाचा शुभारंभ

दापोली : महाराष्ट्राची भव्य परंपरा असलेल्या सोलापूर येथील पारंपरिक हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री दालनाचे दापोली शहरात पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी दापोली तालुक्याच्या तहसीलदार अर्चना बोंबे, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीचे व्हॉइस चेअरमन किशोर नागरगोजे, पेन्शन असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दापोली शहरात पेन्शन असोसिएशनच्या सभागृह येथे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. १२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे दालन सुरू राहणार आहे.

सोलापूर येथील सुप्रसिध्द हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री भाऊराय हॅन्डलूम यांच्याकडून हे कापड दालन खास ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सोलापूर सुप्रसिध्द कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी, खादी सिल्क, खादी कॉटन साडी, पिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, संतरंजी, पंचा, वुलन चादर, टॉवेल, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट, कुर्ता, बंडी, गाऊन, हॅन्डबॅग, लेडीज टॉप कापड कलाकुसर वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. या प्रदर्शन व विक्री झाल्यानंतर खास ग्राहकांसाठी २० टक्के सवलत देण्यात आल्याची माहिती भाऊराय हॅण्डलूमचे पोतन यांनी दिली.

गेली पंधरा वर्षे हे प्रदर्शन दापोली शहरात राधाकृष्ण मंदिर येथे भरत आहे; मात्र यंदा त्या ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने हे प्रदर्शन यंदा पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात भरवण्यात आल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!