मुख्य बातमी

राष्ट्रीय खो-खोपटू सुनील लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक सुनील लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी १९८६ ते १९८९ या कालावधीत सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी बीकॉम, एमए व एलएलएम अशी उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे. कोकण व मुंबईतील विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

दुकाने व आस्थापना विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात प्रभावी जनजागृती केली. यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच व्यापारी संघटनांच्या सहकार्याने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!