मुख्य बातमी

उद्या मतदान दिवशी आठवडा बाजार बंद

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी उद्या (७ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्याठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (ग) (क) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, संगमेश्वर तालुक्यातील माखजन व रत्नागिरी तालुक्यातील निवळी आणि रत्नागिरी शहर येथील आठवडा बाजार ७ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!