क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळूणचा अमर लटके ठरला ‘रत्नागिरी श्री’चा मानकरी

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि आदर्श क्रीडा सामाजिक प्रबोधिनी, चिपळूण यांच्या वतीने आयोजित ‘कै. गिरीधर सीताराम मांजरेकर स्मृती चषक’ जिल्हास्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत चिपळूणच्या अमर लटके याने बाजी मारत ‘रत्नागिरी श्री’ हा मानाचा किताब पटकावला.

चिपळूण येथील वाशिष्ठी सोसायटी, काविळतळी येथील बांदल हायस्कूलच्या प्रांगणात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. सचिन उर्फ भैय्या कदम पुरस्कृत या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सुमारे ९० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार देययष्टीचे प्रदर्शन केले.

प्रताप गिरीधर मांजरेकर व कुटुंबीय यांच्याकडून कै. गिरीधर सीताराम मांजरेकर माजी शरीरसौष्ठव पटू किताब विजेते यांच्या स्मरणार्थ ‘रत्नागिरी श्री’ किताब विजेता अमर लटके इंडियन जीम याला चिपळूण ३१ हजार रुपये व फिरता चषक मिळाला, तर कै. सदुभाऊ पाटणकर स्मृती चषक मानकरी उपविजेता संजय शिवाजी डेरवणकर २१ हजार रुपये व फिरता चषक पवारर्स फिटनेस सावर्डे याला मिळाला.

तसेच रत्नागिरी उदय- रोशन सीताराम बामणे, (स्वामी जीम चिपळूण), रत्नागिरी किशोर- गणेश संजय गोसावी (पवारर्स फिटनेस सावर्डे), रत्नागिरी कुमार- किरण नारायण जाधव (बॉडी हब खेळ), रत्नागिरी श्रीमान- प्रवीण गोपाळ कांगणे (ओमकार फिटनेस दापोली), रत्नागिरी फिजिक्स- संकेत सुधाकर साळवी (साई फिटनेस चिपळूण). रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ९० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. कै.ना.द.लिमये व कै.आबा भिडे यांचे स्मरणार्थ ही रोख बक्षिसे देण्यात आली.

सचिन उर्फ भैय्या कदम व त्यांचे सहकारी यांनी स्पर्धा उत्तमप्रकारे पार पाडली. त्यांचे तर्फे प्रत्येक किताब विजेत्यास शिल्ड व १ ते ३ क्रमांकांना चषक देण्यात आले.रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य व पंचांनी स्पर्धा उत्तमप्रकारे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!