मुख्य बातमी
महिला लोकशाही दिन १६ फेब्रुवारी रोजी

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांच्याद्वारे सांगण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.



