कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वी. प. कोतवडे इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला.
कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईतर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना एक आगळावेगळा कार्यक्रम खोतडे ग्रामस्थ मंडळातील पदाधिकाऱ्यांनी राबविला. याप्रसंगी पालकांच्या कष्टांची जाण असावी आणि त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, शाळा समितीचे अध्यक्ष नरेश कांबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल लांजेकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, सहाय्यक शिक्षक श्री. नाईक, सहाय्यक शिक्षिका सौ. शिल्पा सुर्वे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते.



