मुख्य बातमी
रत्नागिरीत २४ व २५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ‘जागर शिवबाचा’ हा शिवशाहीर प्रा. प्रवीण जाधव आणि संच व सोबत टीम भालकर्सचे नृत्याविष्कार, मर्दानी खेळ आणि २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता रायगडाला जेव्हा जाग येते, (सादरकर्ते श्रींची इच्छा) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. तहसीलदार (सर्वसाधारण) संजय भालेराव यांनी केले आहे.



