सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर

रत्नागिरी : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, रत्नागिरी विभागाची सन २०२६ सालासाठी कार्यकारणीची निवड आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस सतीश मेटकरी, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कर्मचारी हितासाठी अमूल्य साथ मिळावी व कामगार हिताचे निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे यासाठीच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ काम करत आहे. २०२६ ची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी काल विभाग नियंत्रक रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी संतोष बोरकर, उपाध्यक्ष योगेश भोसले, संजिव बने, तेजस रायबागकर (राजापूर आगार) यांच्यासह विधीतज्ञ म्हणून ॲड. संकेत लकेश्री, सचिव वसंत कांबळे (लांजा आगार), सहसचिव सतीश चव्हाण (गुहागर आगार), खजिनदार अक्षय मांडवकर (विभागीय भांडार), सह खजिनदार विलास मोरे (मंडणगड आगार), कार्याध्यक्ष जयप्रकाश दळवी (वि.का.शा), जिल्हा संघटक विजय गोरे (वि.का.शा) प्रसिद्धी सचिव- महेंद्र विखारे (मंडणगड आगार), महिला संघटक- सौ. दुर्गा मोर्लेकर (राजापूर आगार), संघटक सचिव- अंकुश शिंदे (लांजा आगार) यांनी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून मंगेश गोवळकर (वि.का.शा), वेताळ चव्हाण (गुहागर), शशिकांत कांबळे (वि.का.शा), संतोष आबादार (विभागीय भांडार), संतोष आरवकर (भाजपा) नीलेश महादेव आखाडे (भाजपा) यांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
विभाग नियंत्रकांना कार्यकारणीची प्रत देत काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रकांनी देखील नवीन नियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना मजबुतीने काम करेल, असा विश्वास नियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला.



