मुख्य बातमी

फाटक हायस्कूलचे विद्यार्थी आकाशवाणीवर सादर करणार ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ नाटिका 

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर उद्या (१ मार्च) सकाळी ९.३० वाजता ‘बालजगत ‘ या कार्यक्रमामध्ये फाटक हायस्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ ही नाटिका सादर करणार आहेत.

ऋतू आणि निसर्गात होणारे बदल, ऋतूंचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि निसर्गाकडून मानवाने घ्यावयाची शिकवण हे नाट्यछटा, भारुड, संगीत, नाटिका, स्वागत, कथा, कविता याद्वारे विद्यार्थी उलगडून दाखवणार आहेत. यामध्ये इरा उदय गोखले, अर्णव मकरंद पटवर्धन, निर्मयी निलेश जोशी, दूर्वा मंगेश मुरुडकर, मुमुक्षा महेश्वर वझे, स्पृहा तेजराज भावे, अवनी आनंद लिमये हे विद्यार्थी कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांना मनवा हृषिकेश जोशी यांनी हार्मोनियम साथ, तर क्रियंश विश्वजीत चव्हाण यांनी तबला साथ केली आहे. संहिता लेखन, मार्गदर्शन / दिग्दर्शन प्रकाश अनंत देवरुखकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!