मुख्य बातमी
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी ८ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक, ९.३० वाजता पालखी प्रदशिणा, त्यानंतर १० वाजता आरती होईल.
या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.



