मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
चिपळूणमध्ये नगरसेवकाच्या चालकावर हल्ला; गाडीत कोंबून मारहाण

चिपळूण : पालिकेचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मजरेकाशी येथील रहिवासी फैजल कर्जीकर हे गेल्या दोन महिन्यांपासून साजिद सरगुरोह यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री काही व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत चौघांचा सहभाग असल्याचे सांगितले जात असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.
मारहाणीनंतर जखमी अवस्थेत फैजल कर्जीकर यांना तात्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधितांकडून माहिती घेतली जात असून पुढील चौकशी सुरू आहे.


