मुख्य बातमी
जागतिक श्रवण दिन शुक्रवारी

रत्नागिरी : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्ष, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन ६ मार्च सकाळी १० वाजता रोजी स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात कर्णबधीर दिव्यांग मुले व व्यक्तींसाठी सरकारी धोरणे, योजना याबाबत मार्गदर्शन तसेच यशोगाथा सादर करण्यात येणार आहे. संबंधितांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे.



