मुख्य बातमी

रत्नागिरी रेल्वेस्थानकातील मनोरुग्ण ताब्यात; मनोरुग्णालयात दाखल

संपर्क युनिक फाउंडेशनचा पुढाकार

रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे स्थानकात असणाऱ्या मनोरुग्णाला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात एक मनोरुग्ण असल्याची खबर पोलिसांकडून फाउंडेशनला मिळाली. संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांना ही गोष्ट सांगितली. सचिन शिंदे यांनी त्वरित हालचाल करून त्या मनोरुग्णाला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात या रुग्णाची शारीरिक तपासणी केली. तसेच पोलिसांच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मनोरुग्णालयात त्याला घेवून गेले आणि रितसर तेथे दाखल केले.

सचिन शिंदे यांनी यापूर्वी ही साधारणपणे ५०० मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावर उपचार करून बरे केले आहे. संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या माध्यमातून सचिन शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल अध्यक्ष शकील गवाणकर यांनी त्यांना धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!