मुख्य बातमी

मिशन लक्षवेध विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटरमध्ये प्रवेशासाठी २४ मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटरमध्ये निवड होणा-या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे. अर्हताधारक खेळाडूंनी अर्ज २४ मार्च पर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम रेसकोर्स नाका संभाजी नगर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा dvediop@gmail.com या ई-मेलवर मुदतीत सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपसंचालक कोल्हापूर विभाग सुहास पाटील यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांच्याव्दारे प्रथम टप्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, यासाठी राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच ३१ डिसेंबर २०२६ रोजी वय २५ वर्ष आतील असणे आवश्यक आहे. अशी किमान अर्हता असून, मागील २ वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेवून प्रशिक्षणार्थीची निवड अंतिम करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!