मुख्य बातमी

रत्नागिरी पोलीस दल झाले गतिमान 

ताफ्यात नवीन २५ वाहनांचा समावेश : पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत हस्तांतरण सोहळा

रत्नागिरी : पोलीस दलाची गतीमानता वाढवणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे या उद्देशाने जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून रत्नागिरी पोलीस दलासाठी नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी पोलिस मुख्यालयात संपन्न झाला.

यावेळी उदयजी सामंत ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना, जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य असून, पोलीस दलाला आधुनिक आणि नवीन वाहने मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि गतीमानता वाढेल. यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करणे आणि तातडीच्या प्रसंगी घटनास्थळी पोहोचणे आता अधिक सुकर होईल. भविष्यातही पोलीस दलाच्या गरजा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे आश्वस्थ केले.

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!