मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावाला पुन्हा गती

राजापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढ प्रस्तावाला अखेर नव्याने गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराची हद्द वाढविण्यासाठी शासनाकडे नव्याने सविस्तर प्रस्ताव पाठविण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्षा ॲड. यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. सभेत शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. पुररेषेमुळे विस्थापित नागरिकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले असून, या भागातील नागरिकांना नगर परिषदेकडून सेवा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे या नागरिकांचा नगरपालिकेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आणखी काही भाग शहरात समाविष्ट करण्याबाबतही चर्चा झाली.

हद्दवाढीमुळे शहराची लोकसंख्या वाढून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून, पालिकेचा दर्जाही बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे विकास निधीत वाढ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

याशिवाय, शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या (DPR) कामांमधील अडचणी, पाणीसाठवण टाक्यांचे नियोजन आणि रस्त्यांवरील खोदकाम यावरही तीव्र चर्चा झाली. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित ठेकेदारांसोबत लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभेत दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी खर्च करण्याबाबतही चर्चा होऊन, नव्याने नोंदणी झालेल्या लाभार्थींना प्राधान्याने लाभ देण्याचे ठरले. यासाठी यूआयडी प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य देण्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी आउटपुट बेसिसवर सेवा देण्याचा निर्णय, सभागृहातील स्पीकर व्यवस्था अद्ययावत करणे, कार्यालयात इंटरकॉम सुविधा बसविणे, तसेच जेसीबी आणि स्वच्छता विभागासाठी घंटागाडी खरेदी करण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.

सभेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, ॲड. जमिर खलिफे, सुलतान ठाकूर, ॲड. राहुल तांबे, सौरभ खडपे, महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!