मुख्य बातमी

जिजाऊ विशेषांकासाठी लेखन पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रीशक्तीचे जाज्वल्य प्रतीक म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कठोर संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाऊंच्या जीवनातील प्रत्येक पैलू आजही प्रेरणादायी आहे. या तेजस्वी कार्याचा गौरव करण्यासाठी “जिजाऊ विशेषांक” प्रकाशित करण्यात येत असून, या विशेषांकासाठी विविध लेख, कथा, कविता आणि अभ्यासपूर्ण लेखन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इरलं फाऊंडेशन ही नव्याने स्थापन झालेली संस्था असून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेचा स्थापना दिन असून, त्या निमित्ताने जिजाऊ विशेषांक प्रकाशित करण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. या अंकाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि जिजाऊंच्या विचारांनी प्रेरणा घेत नवीन पिढी घडेल.

लेखांची संभाव्य विषयसूची :

जिजाऊंचे बालपण आणि कुटुंब, छत्रपती शिवरायांच्या घडणीतील जिजाऊंची भूमिका, जिजाऊंची राजकीय व प्रशासकीय दूरदृष्टी, महिलांसाठी जिजाऊंचा संदेश, ऐतिहासिक दृष्टिकोनातून जिजाऊ, जिजाऊंवरील लोककथा, गीते आणि कविता, जिजाऊंचा स्त्रीवादी विचार, जिजाऊंचे प्रेरणादायी विचार.

लेखन पाठविण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल असून, (lयानंतर आलेले लेख स्वीकारले जाणार नाहीत. लेखन छापण्याचे सर्व अधिकार हे इरलं फाऊंडेशनकडे राहतील. लेखनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

लेखन पाठविण्याचा ई-मेल : erlfoundation19@gmail.com (आपले लेखन वर्ड फाईल स्वरूपात किंवा टाइप करून पाठवावे.)

अधिक माहितीसाठी संपर्क : 7774947476; 88 88 910998

या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग होऊन, राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लेख, कथा आणि कविता पाठवाव्यात, असे आवाहन इरलं फाऊंडेशन रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!