भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी ४ मे ते १३ मे या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आयोजित मुलाखतीस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑॅफ सैनिक वेलफेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील एसएसबी-६५ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेवून यावे.
या एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवाराने कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन पास केलेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये पात्र झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना घेवून येणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा.


