छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : खेड तालुक्यात एप्रिल महिन्यात कुळवंडी, दस्तुरी, भरणे, कोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी केले आहे.
१० एप्रिल रोजी खेड तालुक्यातील कुळंवडी हायस्कूल, १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तुरी, २४ एप्रिल रोजी धावजी बुवा मंदिर कोरेगाव आणि ३० एप्रिल रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह, भरणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.



