मुख्य बातमी

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती वर्ष

११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ कालावधीत होणार साजरे

रत्नागिरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हे संपूर्ण वर्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या १ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार हे वर्ष ११ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालये अधिनस्त शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था (आश्रम शाळा, नामांकित संस्था, शासकीय वसतीगृहे) पुष्पहार अर्पण करणे, प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!