मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

तेज तेजस केंबळे राज्यस्तरीय, कोकण विभागात चमकला

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तेज तेजस केंबळे याने मंथन राज्यस्तरीय कोकण विभागस्तरीय यादीत १५० पैकी १३४ गुण मिळवून चौथा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. तसेच इयत्ता पहिलीतील श्रेया सचिन सोनवलकर हिने १५० पैकी ९२ गुण मिळवून, शौर्य दीपक बादावटे यांनी १५० पैकी ५४ गुण मिळवून यश संपादन केले.

इयत्ता तिसरीतील शौर्य संजय राठोड याने ३०० पैकी २०४ गुण, हर्षिता नरेंद्र रहाटे हिने ३०० पैकी १९८ गुण तसेच देवांश गणेश कीर्वे याने ३०० पैकी १४६, इयत्ता सहावीतील गार्गी देवेंद्र भोसले हिने ३०० पैकी १२४ गुण, तर इयत्ता सातवीतील विधी गणेश किर्वे हिने ३०० पैकी १४६ गुण मिळवून सुयश संपादन केले.

संस्थेचे अध्यक्ष सचिन बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, दामोदर गोणबरे, सौ. शर्मिष्ठा साळुंखे, सौ. शीतल सोनवलकर, सौ. शमीम मुल्ला, सौ. प्रांजली शिगवण तसेच तेजस केंबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!