मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी : आगार प्रमुख स्वप्नील शिंदे

आबलोली (संदेश कदम) : गुहागर आगारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला. यावेळी गुहागरचे आगार प्रमुख स्वप्नील शिंदे यांनी मौलिक मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेला व देशाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचाराने प्रत्येकाने प्रगती करावी. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खूप मोठे आहे ते समजून जाणून घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आगार प्रमुख स्वप्नील शिंदे, गुहागर तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार पराग कांबळे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे मयुरेश पाटणकर, आगारातील अधिकारी स्नेहा पालकर-विचारे, मंदार कदम, गुहागर बौद्धजन सहकारी संघाचे पदाधिकारी वैभव गमरे, भीमसेन सावंत, महिला मंडळाच्या पदाधिकारी, युवक, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम बौद्ध उपासक शशिकांत जाधव यांनी पूजा पाठ कार्यक्रम विधीपूर्वक पार पाडला. गुहागर आगाराच्या कामगार वर्गाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांनी डॉ. आंबेडकर यांच्या विषयी विचार प्रगट केले.

कार्यक्रमाचे निवेदन वाय. आर. मोहिते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील चालक तथा वाहक आर. बी. गायकवाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राजा गायकवाड,सूर्यकांत भोसले, सी.जी जोगदंड, आर. एन. ढाले, श्री. पैठणे, जी. के. हंकारे, आर. जी. शिलवंत, आर. के. सोनकांबळे, पी. एम. मोहिते, एन. बी. सावळे, एस. एम. आवळे, आर. एस. मोहिते, पी. एम. गायकवाड, ऐ. बी. कांबळे, जी. एन. रायभोळे, एन. एन. वाघमारे, पी. एम. मोहिते, रामेश्वर गायकवाड, संदीप जाधव, डी. वाय. कदम, डी. आर. कदम, ए. एस. कदम, सचिन होळंबे, ए. ए. पाटील आधी चालक व वाहक याने प्रचंड मेहनत घेतली. जयंतीनिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांना बुंदीचे लाडू, फरसाण व सरबत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सर्व नागरिक, प्रवाशी, अधिकारी, गुहागर तालुका प्रवासी संघटना, गुहागर पोलीस ठाणे आदींनी सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आर. बी. गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!