मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खोडदे येथील अनुज साळवीचे सीबीएसई दहावी परीक्षेत यश

आबलोली (संदेश कदम) : खोडदे (ता. गुहागर) येथील रहिवासी आणि पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचा (ता. राजापूर) विद्यार्थी अनुज संदेश साळवी याने २०२६ मध्ये घेतलेल्या सीबीएसई इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. नवोदय विद्यालयातून तो अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला असून परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

अनुजचे वडील संदेश गजानन साळवी हे व्यावसायिक असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर या नावाने संगणक प्रशिक्षण केंद्र चालवतात. त्याची आई सावी संदेश साळवी या महा ई-सेवा केंद्रचालक म्हणून कार्यरत आहेत. आजोबा गजानन साळवी हेही प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. अनुजची बहीण अदिती साळवी हिची देखील नवोदय विद्यालयात निवड झाल्याने साळवी कुटुंबाच्या शैक्षणिक यशात आणखी भर पडली आहे.

अनुजच्या या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला यशाची साथ लाभल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!