मुख्य बातमी

स्थानिक व्यवसायांना ऑनलाइन बाजारपेठेची नवी संधी

अनबॉक्स व क्विकबॉक्सचा नवा उपक्रम :  नोंदणी फी व कमिशनशिवाय उत्पादने विक्रीची सुविधा

रत्नागिरी : स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांना ऑनलाइन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी एनजीओ क्विकबॉक्स आणि रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायरने नवा डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता स्थानिक प्रत्येक दुकानदाराला आपली उत्पादने सहजपणे ऑनलाइन विकता येणार आहेत. तसेच तसेच क्विकबॉक्सकडून वस्तू घरपोच केल्या जाणार आहेत.

सध्याच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी ऑनलाइन उपस्थिती अत्यंत महत्त्वाची बनली असून, ‘क्विकबॉक्स’च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना आपली ओळख निर्माण करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर कोणतीही नोंदणी फी किंवा कमिशन आकारले जाणार नसून, व्यापाऱ्यांना आपली उत्पादने जाहिरात करण्याचीही सुविधा मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन उपस्थिती अत्यंत महत्त्वाची झाली आहे. क्विकबॉक्सच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक आपल्या दुकानाचा विस्तार करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. या करिता शॉप अॅक्ट लायसन्स किंवा भाडेकरार, फूड लायसन्स (लागू असल्यास), पॅनकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स किंवा रद्द केलेला धनादेश अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

या प्लॅटफॉर्मचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोपा व वापरण्यास सुलभ इंटरफेस. त्यामुळे लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी हा प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी इच्छुक व्यावसायिकांनी आगाशे एम्पायर, नाचणे – साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी, संपर्क – 8830710154 येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!