मुख्य बातमी

चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास गाडीतून ओढून मारहाण करून सोन्याच्या चेनचे नुकसान केले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक खरात (वय २२, रा. मुळ खानवली, ता. लांजा. सध्या रा. सापुचेतळे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (२५ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास चांदोर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रमेश बाबू भोजे (वय ४९, रा. चांदोर, दोन आंबावाडी, रत्नागिरी) यांना संशयित प्रतीक खरात याने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून तुम्ही माझ्या चालकाला धमकी दिली का असे विचारले. त्यावेळी फिर्यादी रमेश भोजे यांनी धमकी दिली नाही, असे सांगितले असता संशयित शिवीगाळ करून त्रास देवू लागला. फिर्यादी हे संशयित प्रतीक याला ओळखत असलेल्या माणसाला मोटार घेऊन सापुचेतळे येथे भेटायला गेले. त्यावेळी संशयित खरात याने फिर्यादी यांची गाडी पुढे जाऊन थांबविली व संशयिताने गाडीचा दरवाजा उघडून फिर्यादी यांना बाहेर ओढले व हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी रमेश यांच्या पाठीवर, उजव्या हातावर मारहाण केली आणि रस्त्यात ढकलून दिले.

या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले. तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी रमेश भोजे यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!