राजापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.९८ टक्के

राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या निकालात राजापूर तालुक्याने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत ९४.९८ टक्के निकालाची नोंद केली आहे.
या परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण १२०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ६६ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी मिळवली असून २२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५६८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २८२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी करत विशेष उल्लेखनीय यश मिळवले आहे. यामध्ये जैतापूर, कशेळी, कोंडये, मूर, देवाचे गोठणे, शासकीय तंत्रनिकेतन तसेच कुंभवडे कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.
इतर महाविद्यालयांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत : राजापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय : ९५.६० टक्के, पाचल कनिष्ठ महाविद्यालय : ९६.४२ टक्के, वाटूळ कनिष्ठ महाविद्यालय : ९३.९३ टक्के, ओणी कनिष्ठ महाविद्यालय : ९४.२३ टक्के, नवजीवन कनिष्ठ महाविद्यालय (राजापूर) : ९३.४१ टक्के, आडिवरे कनिष्ठ महाविद्यालय : ९४.६४ टक्के, जानशी कनिष्ठ महाविद्यालय : ८३.७२ टक्के, नाटे कनिष्ठ महाविद्यालय : ८८.८८ टक्के आणि नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय : ९३.०२ टक्के.
या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, तसेच संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


