मुख्य बातमी

रत्नागिरी-पावस मार्गावर मोटार-दुचाकीची धडक

दोन महिलांसह सहा वर्षांची मुलगी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी-पावस मार्गावर रविवारी (ता. १०) सायंकाळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला आणि सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. हा अपघात सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास मार्गावरील एका हॉटेलसमोर घडला.

या अपघातात तेजश्री अमित मोहिले (वय ३६), तिर्था मुरकर (६५) आणि महिशा अमित मोहिले (६, सर्व रा. शांतीनगर, रत्नागिरी) या तिघी जखमी झाल्या आहेत. तेजश्री मोहिले या दुचाकीवरून तिर्था मुरकर आणि मुलगी महिशाला घेऊन पावसच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!