मुख्य बातमी

जीडीसी ॲण्ड ए व सीएचएम परीक्षेची परीक्षा २६, २७ व २८ मे रोजी; बैठक व्यवस्था जाहीर

रत्नागिरी : शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २६, २७ व २८ मे रोजी रत्नागिरी केंद्रासाठी एकूण ४०० पररीक्षार्थींकरिता आहे. त्यांची बैठक व्यवस्था भारत शिक्षण मंडळाद्वारे पटवर्धन हायस्कूल, आठवडा बाजार शेजारी, मारूती आळी, रत्नागिरी येथे पहिला मजल्यावरील १ ते १४ खोल्यांमध्ये करण्यात आली आहे.

परीक्षा दोन सत्रांमध्ये (प्रथम सत्र सकाळी १० ते दुपारी १ आणि द्वितीय सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत ) घेण्यात येईल. परीक्षा केंद्रावर किमान ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर मूळ ओळखपत्र (उदा. ड्रायव्हींग लाइसन्स/पॅनकार्ड/आधार कार्ड/निवडणूक ओळखपत्र) सोबत आणणे. परीक्षा केंद्रावर पुस्तके, वह्या, इतर कागदपत्रे, मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, डिजिटल घड्याळ व इतर इलेक्ट्रानिक साहित्य वारपण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्रामध्ये फक्त पारदर्शक पाणी बॉटल, पारदर्शक पट्टी व पॅडचा वापर अनुज्ञेय राहील. परीक्षा केंद्रावर ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकीट) असणाऱ्या परीक्षार्थींनाच प्रवेश दिला जाईल, ज्या परिक्षार्थींचे हजेरीपत्रकामध्ये नाव असेल तथापि, हॉलतिकीट जनरेट झाले नसेल/ त्यांचेकडे हॉलतिकीट नसल्यास परिक्षार्थींनी परीक्षेच्या वेळेस त्यांचे फोटो असलेले अधिकृत्त मूळ व ओळखपत्राच्या छायाप्रतींसह (उदा. ड्रायव्हींग लाइसन्स/पॅन कार्ड/आधार कार्ड/निवडणूक ओळख पत्र) मुख्य कक्ष नियंत्रण अधिकारी सुदाम रोकडे यांच्याशी २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता, तर २६ मे रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ९.४५ वाजेपर्यंत संपर्क करावा, या सूचना परिक्षार्थींसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!