मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
खेडमध्ये भाजपच्या वतीने बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खेड : नुकत्याच निकाल लागलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अन्वी अभिजीत कानडे (९५ टक्के), तन्वी अभिजीत कानडे (९२ टक्के), ओम सागर कारवा (९०.०८ टक्के), ध्यानी पटेल (९३.४० टक्के), सिद्धी विलास शेळके (९६.०२) यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, स्वराज गांधी, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.



