मुख्य बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ रविवारी

पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूल उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ ही परीक्षा उद्या (३१ मे) रोजी रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूल या उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी १० वा. ते दुपारी १२ वा. व दुपारी ३ वा. ते सायंकाळी ५ वा.) या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ५५४ उमेदवार परीक्षेस बसणार आहेत.

या परीक्षेची बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.

पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या उपकेंद्रावर – RT3900001 ते RT3900240

फाटक हायस्कूल रत्नागिरी या उपकेंद्रावर – RT3900241 ते RT3900554

या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा / गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!