मुख्य बातमी
नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजीया मुजावर यांच्या पाठपुराव्याला यश
कोकण नगर येथील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक चार कोकण नगर परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारी आणि मागणीची दखल घेत नगरसेवक केतन शेट्ये व नगरसेविका फोजिया मुजावर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावले.
या कामामुळे परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित झाले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
यापुढेही प्रभागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फोजिया मुजावर यांनी सांगितले.



