मुख्य बातमी
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांच्या गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र डिजिलॉकर प्रणालीवर उपलब्ध

रत्नागिरी : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र अपार आयडी शी संलग्न स्वरूपात डिजीलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील. त्याचप्रमाणे हे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या ई मार्कशिट पोर्टल वर https://boardmarksheet.maharashtra.gov.in वर डिजिटल गुणपत्रक तथा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागिय सचिव पुनिता गुरव यांनी दिली आहे.



