मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बेनीबुद्रुक (लांजा) येथे रात्री घरात घुसून बिबट्याचा जीवघेणा हल्ला

दोघेजण जखमी : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

लांजा : तालुक्यातील बेनीबुद्रुक येथील कुसुममळेवाडीमध्ये काल (३ जून) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसून बिबट्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या एका १९ वर्षीय युवकावरही बिबट्याने झडप घातल्याने तोही जखमी झाला आहे. या थरारक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीत बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व काही शांत असताना, अचानक घराच्या पाठीमागील बाजूने एक बिबट्या घरात शिरला. काही समजण्याच्या आतच समोर आलेल्या बिबट्याने घरातील ५२ वर्षीय व्यक्तीवर थेट झडप घातली. बिबट्याने हल्ला करताच संबंधित व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून शेजारी राहणारा १९ वर्षीय युवक तात्काळ त्यांच्या मदतीसाठी घराकडे धावला. मात्र, बिबट्याने त्या युवकावरही हल्ला चढवला. या दुहेरी हल्ल्यामध्ये दोघेही जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!