मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात सीईटीपी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कारखान्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी प्रकल्पाचा व्यवस्थापनावर टीका केली आणि हा प्रकल्प शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

सीईटीपी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लोटे एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केले जाणार नसल्याचे आमदार स्पष्ट केले. तसेच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

लोटे परिसर प्रदूषण मुक्त करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश बामणे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, पप्पू नीमनकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!