मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हासामाजिक
जि. प. पाटपन्हाळे शाळा नं.२ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नं.२ पाटपन्हाळे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पाटपन्हाळे गावचे सरपंच विजय तेलगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संतोष गमरे यांनी केले तर प्रस्ताविक ॲड. दिनेश कदम यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच विजय तेलगडे यांनी शुभेच्छा देताना या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व तेज सोशल फाउंडेशन या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन ॲड. दिनेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.



