मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बदल होणारे निरंतर शिक्षण घेत राहणे आवश्यक : प्रा. संतोष मराठे 

दापोली : “शिक्षणाच धोरण व पद्धती बदलल्या आहेत, त्या समजून घेऊन आपण बदल झालेले अद्ययावत निरंतर शिक्षण घेत राहणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे जेष्ठ प्रा. संतोष मराठे यांनी केले. तालुक्यातील आसूद ग्रामपंचायत सभागृहात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्रिवेणी संगम ग्रुपकडून आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गावचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकाजी कानसे, ग्रामविकास अधिकारी विनोद गझने,आंबोली पोलीस पाटील रोशनी बडवे, नासिर मुरुडकर दिलीप बांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

लहान मुलांनीही स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड यासारख्या गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे, असे सांगत लहान विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाचा त्यांनी कौतुक केले. बदललेली शिक्षण पद्धती शैक्षणिक क्षेत्रात होत जाणार अपग्रेडेशन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अतिशय सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. बारावीनंतर तुम्ही जरूर तुमच्या आवडत्या विषयातील क्षेत्रात महाविद्यालयात प्रवेश घ्या पण त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचा व्यवसायिक अभ्यासक्रमही ऑनलाईन पद्धतीने करा त्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्कीच उपयोग होईल. बदलत्या काळात या शिक्षण पद्धतीचे असलेलं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. आता केवळ एकच डिग्री न घेता दुरस्थ अभ्यासक्रमाच्या पद्धतीने आता एकावेळी दोन डिग्री घेता येतात हा अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटरद्वारे करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तम पद्धतीने अभ्यास करून मार्क मिळवल्यास राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधलं.

असूद येथील सौ. दाबके यांनी मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन करिअरसाठी मुंबईकडे धाव न घेता आपल्या गावातच राहून नोकरी व्यवसाय करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी इयत्ता पहिली ते दहावी व बारावी या येथेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वही पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा ही त्रिवेणी संगम ग्रुपच्या वतीने सन्मान यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश माने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!