क्रीडामुख्य बातमी

लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला चारली धूळ

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पाडला. या रोमहर्षक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादच्या संघाला पाच विकेट्सने धुळ चारली. हैदराबादच्या संघाने दिलेल्या १९१ धावांचे आव्हान लखनौने १७ व्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६७ धावा केल्या.

हैदराबादच्या संघाने दिलेल्या १९१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौची सुरुवात आक्रमक झाली. सलामवीर मिशेल मार्श आणि निकोलस पुरनने पॉवर प्लेमध्ये तुफानी फलंदाजी केली. पुरनने अवघ्या २० धावांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. निकोलस पूरन ७० धावा करून बाद झाला. त्याने २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकार मारले. अर्धशतक झळकावल्यानंतर मिचेल मार्श बाद झाला. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत ५२ धावा केल्या. तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादवने भेदक मारा करत हैदराबादच्या दिग्गजांना स्वस्तात तंबुत पाठवले. शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्मा आणि इशान किशानला आऊट केले. अभिषेक शर्मा अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यानंतर ईशान किशानही शून्यावर तंबुत परतला. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडसह अनिकेत वर्माने १३ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याने ५ षटकार मारले. नितीश रेड्डीने ३२ धावांचे योगदान दिले. तर अभिषेक शर्मा ६ धावा करून बाद झाला. क्लासेन २६ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सने ४ चेंडूत १८ धावा केल्या. शार्दुलने ४ षटकांत ४ विकेटसह ३४ धावा दिल्या. दिग्वेश राठी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!