महाराष्ट्रमुख्य बातमी

भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची!

वारकऱ्यांच्या सेवेसाठी 'आरोग्यसंपन्न वारी' ॲपचे उद्घाटन!

मुंबई : आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या “आरोग्यसंपन्न वारी” या विशेष डिजिटल ॲप्लिकेशनचे उद्घाटन आज सुरूची निवासस्थान, मुंबई येथे करण्यात आले.

हे डिजिटल ॲप वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी आरोग्य सेवा, आपत्कालीन मदत आणि आवश्यक सुविधांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे सर्वसमावेशक डिजिटल माध्यम ठरणार आहे. या ॲपच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा, डॉक्टरांची माहिती, आरोग्य केंद्रे, ‘आपला दवाखाना’, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, चरण सेवा केंद्र, हिरकणी कक्ष, मुक्काम व विसावा स्थळे तसेच महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांसारख्या अत्यावश्यक सेवांची माहिती वारकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासोबतच वारीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त संजय काटकर, देवळी-पुळगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!