मुख्य बातमी

रत्नागिरीत ३१ जुलैपासून जिल्हा कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत दुसरी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

टिळक आळी येथील वैद्य मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा रंगणार असून, ३१ जुलैला सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. या वर्षातील ही दुसरी जिल्हा मानांकन स्पर्धा आहे. ही स्पर्धा आठ गटांत खेळवली जाणार असून, त्यामध्ये पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट (पुरुष), कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट यांचा समावेश आहे. वयस्कर गटातील खेळाडूंना पुरुष एकेरीमध्येही सहभाग घेता येईल. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यक स्पर्धा शुल्कासह तालुका प्रतिनिधींकडे जमा कराव्यात. या स्पर्धेत कॅरम खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते आणि खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!