मुख्य बातमी

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे १ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. सुरेंद्रजी तावडे हे शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता रत्नागिरी बार असोसिएशनला भेट देणार आहेत. यावेळी ते “ग्राहक संरक्षण कायद्याची कल्याणकारी उद्दिष्टे” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथील नवीन इमारतीमधील रूम क्रमांक २०६ येथे आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी बार असोसिएशनने सर्व वकील, विधी क्षेत्रातील अभ्यासक तसेच इच्छुक नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मा. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांचे प्राथमिक शिक्षण कणकवली येथे झाले असून त्यांनी न्यू लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. न्यायव्यवस्थेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत २०१९ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या ते राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!